बोट राइड
मी असंख्य वेळा बोटींनी प्रवास केला आहे आणि विविध प्रकारच्या बोटींचा अनुभव घेतला आहे. सामान्यतः आम्ही केवळ उन्हाळ्यात बोटीतून प्रवास करतो. माझी आवडती बोट पॅडल बोट आहे, कारण त्यात बसणे आणि चालवणे आरामदायक आहे, अगदी सायकल चालवण्यासारखे. आम्ही सहसा तलावावर एका किनाऱ्यापासून दुसऱ्या बाजूला तासभर प्रवास करतो. पाण्यातील लहरा, मंद वारा, आणि गप्पागोष्टीं मुळे हा प्रवास मनोरंजक ठरतो. मी नेहमी सर्फिंग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सर्फबोर्ड आणि सर्फिंग हाताळण्याची परिपक्वता माझ्यात येई पर्यंत मी पॅडल बोट चालवत राहील. मी रोइंग बोट चालवण्याचा हि प्रयत्न केला आहे, पण त्यासाठी खूप ताकद लागते. पन्हाळ उचलण्यासाठी खूप शक्ती लागते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना लगेचच थकवा जाणवतो. मी एकदा पन्हाळ चालवायचा प्रयत्न करून बघितला आणि लगेचच पन्हाळ वडिलांना दिले. अधून मधून आम्ही मोटार बोटीने प्रवास केला आहे. बोटीचा वेग वाढल्यावर मागच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याचे दृश्य चित्तथरारक दिसते. एकदा दोन कुटुंबे, आम्ही आणि आमचे मित्र मिळून एका मोठ्या मोटरबोटने प्रवास केला. सगळ्यांनी आनंद...