बोट राइड

 मी असंख्य वेळा बोटींनी प्रवास केला आहे आणि विविध प्रकारच्या बोटींचा अनुभव घेतला आहे. सामान्यतः आम्ही केवळ उन्हाळ्यात बोटीतून प्रवास करतो. माझी आवडती बोट पॅडल बोट आहे, कारण त्यात बसणे आणि चालवणे आरामदायक आहे, अगदी सायकल चालवण्यासारखे. आम्ही सहसा तलावावर एका किनाऱ्यापासून दुसऱ्या बाजूला तासभर प्रवास करतो. पाण्यातील लहरा, मंद वारा, आणि गप्पागोष्टीं मुळे हा प्रवास मनोरंजक ठरतो. मी नेहमी सर्फिंग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सर्फबोर्ड आणि सर्फिंग हाताळण्याची परिपक्वता माझ्यात येई पर्यंत मी पॅडल बोट चालवत राहील.

मी रोइंग बोट चालवण्याचा हि प्रयत्न केला आहे, पण त्यासाठी खूप ताकद लागते. पन्हाळ उचलण्यासाठी खूप शक्ती लागते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना लगेचच थकवा जाणवतो. मी एकदा पन्हाळ चालवायचा प्रयत्न करून बघितला आणि लगेचच पन्हाळ वडिलांना दिले.

अधून मधून आम्ही मोटार बोटीने प्रवास केला आहे. बोटीचा वेग वाढल्यावर मागच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याचे दृश्य चित्तथरारक दिसते. एकदा दोन कुटुंबे, आम्ही आणि आमचे मित्र मिळून एका मोठ्या मोटरबोटने प्रवास केला. सगळ्यांनी आनंदाने बोट चालत असताना इंजिनच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात गाणे गायले.

सिएटलमधील प्यूजेट साऊंड पासून लहान बेटांदरम्यान असंख्य मोठ्या फेरी (प्रवासी बोटी) चालतात. बोटीच्या डेकवर उभे राहण्यास रोमांचकारी वाटते, परंतु थंड वार्याच्या लहरींमुळे आपण जास्त वेळ तिथे उभे राहू शकत नाही. या फेरी आपल्या गाड्या खालच्या डेकवरून नेतात. फेरी घाटावर पोहोचल्यानंतर आपण आरामात फेरीतून कार बाहेर काढू शकतो. फेरीमध्ये रेस्टॉरंट्स, दुकाने, आराम खुर्च्या, पादचारी जागा, पाहण्यासाठी डेक अशा बर्याच सुविधा असतात ज्यामुळे या फेरीचा आकार भव्य होतो. 

लांबच्या परावासासाठी क्रूझ जहाज हा एक अप्रतिम पर्याय आहे. या जहाजांवर बरेच काही करण्यासाठी असते, जसे, खेळणे, खाणे, नृत्य करणे झोपणे, आणि खूप काही. आम्ही दोनदा समुद्र पर्यटनासाठी क्रूझने गेलो आहोत. एकदा यूएस ते कॅनडा आणि दुसऱ्यांदा यूएस ते मेक्सिको. हे दोन्ही प्रवास अतिशय आनंददायी होते. एकदा तुम्ही समुद्रपर्यटनाचा अनुभव घेतला की, तुम्हाला पुन्हा जावेसे वाटेल.

छोटी बोट असो किंवा मोठे जहाज, त्यावरून प्रवास करणे नेहमीच आकर्षक असते. जेव्हा आपण बोटी आणि जहाजांबद्दल बोलतो तेव्हा मच्छिमारांची आठवण येते. हे धाडसी लोकं पाऊस, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करत, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी मासे पकडून आणतात. मी या मच्छिमारांचा आभारी ज्यांच्यामुळे आपल्याला स्वादिष्ट मासे खायला मिळतात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

हॅलोविन

डब्बा पार्टी - Potluck