स्कूल बस - school bus

शाळेच्या बसमधून प्रवास करण्यात मला नेहमीच आकर्षण असतं. माझ्या शाळेच्या बस पिवळ्या आणि केशरी रंगाच्या आहेत. या बसेस वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. प्रत्येक मार्गाचे नाव रंगावरून दिले आहे. हे रंग-कोड मार्ग दर्शवतात. माझा मार्ग लाल मार्ग आहे. प्रत्येक मार्गावर अनेक स्टॉप आहेत. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळेत पोहोचवण्यासाठी बस प्रत्येक स्टॉपवर थांबते. 

माझे बाबा किंवा आई मला बस स्टॉपवर घेऊन यायचे. आम्ही सर्व विद्यार्थी रांगेत थांबायचो. शाळेची बस वक्तशीर असायची आणि ठरल्या वेळी यायची. बस आल्यावर आम्ही सर्वजण एक एक करून शांतपणे बस मध्ये बसायचो. जर माझी सीट खिडकीजवळ असेल तर मी आई-बाबांना टाटा करायचो. उन्हाळ्यात आजी-आजोबा बस स्टॉपवर दिसायचे. मोठा झाल्यावर मी आई-बाबां शिवाय बस स्टॉपवर एकटाच जायला लागलो. मला माझ्या मित्राच्या शेजारी बसायला आवडायचे, म्हणून त्याच्या शेजारीची सीट मोकळी असल्यास मी नेहमी त्याच्या शेजारी बसायचो. 

सुरक्षेची वैशिष्ट्ये पाहता, बसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्याच्या अनेक बाबी असतात. सर्व विद्यार्थी बसल्यानंतर बसचा दरवाजा बंद केला जातो. बस थांबली की बसच्या पुढच्या आणि मागच्या भागात लाल दिवे चमकतात. बस सुरू झाल्यावर दिवे बंद होतात आणि वाहतूक नियमित होते. आमचा ड्रायव्हर सावध असायचा, तो वेगाने गाडी चालवत नसे, आणि स्टॉपवर येताना तो गाडीचा वेग कमी करून बस थांबवत असे.

पावसाळ्यात छत्र्या बसमध्ये नेण्यास मनाई असते. मी छत्री दुमडून माझ्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना द्यायचो. हिवाळ्यात, बर्फ पडल्यावर बस फक्त काही मार्गांवरूनच जात असे. मला बर्फ पडत असताना प्रवास करायला खूप आवडायचे.

मी नेहमी बस स्टॉपवर थोडा लवकरच पोहोचतो. कधीकधी उशिरा उठल्यामुळे किंवा काही कारणास्तव मला बस स्टॉप वर पोहोचायला उशीर झाला तर बस पकडण्यासाठी धावत जायला लागत असे. जर ड्रायव्हरने मला त्याच्या रियरव्ह्यू मिररमधून पाहिलं, तर तो नक्कीच माझ्या चढण्याची वाट पाहत असे. दोन कारणांसाठी धावत बस पकडणे मला पसंत नाही, एक, अर्थातच, जड बॅकपॅकसह धावल्यामुळे मला दम लागतो. दुसरे म्हणजे, मला वाईट वाटते की माझ्यामुळे इतरांनाही उशीर होतो. म्हणून मी विलंब टाळतो.

थँक्सगिव्हिंग डे ला, आम्ही सर्व विद्यार्थी, बस ड्रायव्हरला ग्रीटिंग कार्ड आणि लहान भेटवस्तू देतो. रोज तो आमची काळजी घेतो। त्याबद्दल सर्व मुले ड्रायव्हरला कृतज्ञता व्यक्त करतात. आम्ही त्याला सर्व सणांच्या दिवशी शुभेच्छा देतो. तो कधी कधी बसमध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टम वापरून आमच्याशी बोलतो.

बस शाळेत पोहोचल्यावर आम्ही व्यवस्थितपणे उतरून आपापल्या वर्गात जायचो. मग बस पुढच्या पिकअपसाठी निघत असे. शाळा संपली की आम्ही बसमध्ये चढायचो आणि आपापल्या स्टॉपवर परत जायचो. मला स्कूल बसने प्रवास करायला आवडते. त्याचप्रमाणे मला सार्वजनिक बसनेही प्रवास करायला आवडते. पण मला सार्वजनिक बसने प्रवास करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. अनेक प्रकारच्या बसेस असतात, सिटी बस, पर्यटन बस, स्लीपर बस. भविष्यात जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मला सर्व प्रकारच्या बस मधून प्रवास करायला आवडेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

हॅलोविन