फ्रॅंकलिन धबदबा (फॉल्स)
उन्हाळ्यात पर्वतांवर चढाई करणे खूप सामान्य आहे, परंतु हिवाळ्यात बर्फाळ ढगांच्या शिखरांवर चढाई करणे साहसी आणि कठीण आहे. हा एक ताजा आणि नवीन अनुभव आहे. एका हिवाळ्यात, कार्ती, गुरु, गणेशन आणि सेंधिल ट्रेकिंगला निघाले.
पहाटे ५ वाजता ते तयार झाले आणि इस्साक्वा बस स्थानका पासुन एका रोमांचकारी प्रवासाची सुरुवात केली. एकमेकांच्या परिचयानंतर त्यांनी तिरुमंधिरम या सर्वात जुन्या तमिळ पुस्तकावर चर्चा केली। या पुस्तकात शारीरिक आणि मानसिक आरोग्य, योगिक पद्धती, श्वासोच्छवासाचे व्यायाम अशा बर्याच विषयांवर भाष्य आहे. गणेशनला सिलंबम (काठयांनी लढण्याची लोककला) आणि टिन कारखान्यात काम करणाऱ्या त्याच्या सिलंबम शिक्षकाची आठवण आली. त्यांच्या कामाच्या वेळेनंतर, रात्री ९ च्या सुमारास, ते वचनबद्धतेने, जुने टायर जाळून गणेशनला सिलंबमची कला शिकवत असे. त्या काळात, शिक्षक बुद्धिमान आणि त्यांच्या कामात पूर्ण समर्पित होते. असे शिक्षक तरुणांसाठी आदर्श होते. आजकाल असे उत्साही शिक्षक दुर्मिळ आहेत. विद्यार्थी आणखी दुर्मिळ आहेत. कार्तीने निराशा व्यक्त केली की, जरी चांगले कलारी शिक्षक असले तरी, त्यांना नौकरी देणारे कोणी नाही.
गणेशन यांनी 'पुली नादनम' (वाघ नृत्य) बद्दल सांगितले. या कलेमध्ये नर्तक आपले शरीर वाघासारखे रंगवतो आणि जिम्नॅस्टिक्स आणि नृत्य यांचे मिश्रण करून नाचतो. नर्तकांना परिपूर्णता मिळविण्यासाठी आणि जमलेल्या गर्दीचे संपूर्ण लक्ष वेधण्यासाठी आणि प्रेक्षकांना त्यात सहभागी करण्यासाठी कठोर सराव करावा लागतो.
लोककलांचे हे प्रकार सादर करणे सोपे वाटते, परंतु जर एखाद्याचे आरोग्य परिपूर्ण असेल आणि सराव कठोर असेल तरच ते या कलाप्रकारांचे सादरीकरण करू शकतात. पुली नृत्य, सिलंबम, तलवारबाजी इत्यादी सादर करणारे लोक साधारण आणि मनोरंजक दिसतील कारण ते निरोगी आणि तंदुरुस्त असतात.
आजकाल आळसाने आपल्याला वेढले आहे, विशेषतः लहान मुलांना. त्यांना निरोगी जीवनशैलीचीही जाणीव नाही, असा गणेशन ने विलाप केला. कांजीपुरम बोम्मैकरन रस्त्यावर प्रचलित असलेली कला गुरुला आठवली, ज्याला 'वझु मारम' म्हणतात (शब्दशः अर्थाने निसरडा वृक्ष, परंतु तिथे एकही झाड नाही). त्या चौकाच्या मध्यभागी एक मोठा खांब उभारला आहे, ज्यावर ते तेला सारखे अनेक निसरडे पदार्थ लावतात। त्या खांबावर भेटवस्तू बांधली जाते आणि कलाकार चढण्यासाठी एक मानवी बुरुज तयार करतात. आजूबाजूचे लोक हळद पावडर मिसळलेले पाणी फेकतात, त्यामुळे ते अधिक निसरडे होते. आजूबाजूचे लोक खांबावरच्या भेटवस्तूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना आनंदाने उत्तेजक घोषणा देऊन प्रोत्साहन देतात. तरुण मुले त्या खांबावर चढतात, घसरतात आणि पुन्हा चढतात. अशा अनेक प्रयत्नांनंतर मुले जिंकल्यावर खेळ पहाणारे दर्शक उत्साहानी टाळ्या वाजवून आनंद साजरा करतात, जणू काही दर्शक स्वतःच विजयी झाले आहेत. असे खेळ आता जवळजवळ नामशेष होत चालले आहेत आणि आपली मातृभूमी अशा शौर्यपूर्ण खेळांपासून वंचित होत चालली आहे.
शेवटी, ते फ्रँकलिन फॉल्सकडे जाण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर पोहोचले. महामार्गावरून बाहेर पडून, ते धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागले, तिथे दाट आंधार होता. महामार्गावरच्या वेगाने येणाऱ्या वाहनांचा आवाज दूर सरत होता. चालत असताना थंड वाऱ्याची झुळूक अलगद स्पर्श करत होती. ते पार्किंगमध्ये पोहोचले. या पहाटेच्या वेळी तिथे एक कार आधीच उभी होती. धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर त्या ठिकाणाहून पुढे कोणत्याही वाहनाला परवानगी नसल्याने, त्यांनी त्यांची कार उभी केली आणि चालायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंना अगदी पांढऱ्या भिंतीसारखा बर्फ साठला होता.
रस्त्यावर फक्त हे चौघेच होते. थोडा वेळ चालल्यानंतर त्यांच्या शरीराला थंड वाऱ्याची सवय झाली आणि खरं तर त्यांना कपड्यांचा हिवाळ्याचा थर सैल करावासा वाटला. काही मिनिटे चालल्यानंतरचा रस्ता बर्फाने भरला होता. पहाटेच्या प्रकाशाने आकाश भरून आले होते। या वातावरणात दिसणाऱ्या त्या सुंदर धबधब्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. हातमोजे काढून काही फोटो काढल्यानंतर, त्यांचे हात थंड वार्यामुळे गोठले. इतक्या लवकर येऊन फ्रँकलिन धबधबा पाहण्यासाठी चालण्याचे सर्व प्रयत्न खूप सार्थकी लागले. धबधब्याने त्यांना समाधान दिले आणि त्यांना मोठ्या आनंदाने भरून टाकले.
आता पहाट झाली होती आणि उज्ज्वल दिवस सुरू झाला होता. गुरू जयमोहनची कहाणी सांगत होता. ती कहाणी ऐकता ऐकता ते त्यांच्या गाडीकडे परत गेले आणि धबधब्याकडे जाणाऱ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, जसे की 'किती दूर आहे?' आणि 'खूप थंडी आहे का?' त्यांनी अंकुर, मिठाई चा नाश्ता केला आणि त्यांच्या गाडीजवळ पोहोचले.
गाडीत चढताना त्यांनी उबदार हवेचा आनंद घेतला आणि राजकारण आणि सिनेमासारख्या विषयांवर त्यांचे संभाषण चालू ठेवले. चांगल्या मित्रांसह डोंगरात ट्रेकिंग करणे हा एक उत्तम अनुभव आहे ज्यामुळे चांगल्या आठवणी निर्माण होतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा