पोस्ट्स

हिमवर्षाव

हिवाळा सुरू झाला की मी बर्फाच्या दिवसाची वाट पाहतो. आकाशातून बर्फ पडताना खूप सुंदर दिसतो. तो हवेत तरंगत हळुवारपणे जमिनीवर पडतो. कधीकधी तो पावसासारखे जलद आणि जोरात पडतो. बर्फ पडताच, जमीन हळूहळू पांढऱ्या पडद्या सरखी दिसते. घराचे छप्पर, झाडाच्या फांद्या, रस्ता, गवत सर्व पांढरे होतात. बर्फाळ दिवशी गाडी चालवताना, विंडशील्डवर बर्फ पडणे हे एक सुंदर दृश्य असते. विंडशील्ड वाइपर बर्फ दूर ढकलत असताना बर्फ परत येतो आणि विंडशील्डवर पुन्हा पुन्हा चिकटतो हे पाहणे खूप रोमांचक असते. वारा बर्फाने भरलेला असतो आणि तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे ते बर्फाचे ठिपके म्हणून दिसत असतात. बर्फ पडत असताना प्रवास करणे हा एक वेगळाच अनुभव असतो.  जेव्हा बर्फ पडतो आणि सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा आम्ही बर्फाची खेळणी बनवायला जातो. बर्फाचा ढीग करून तो एका जागी आणून एक मोठे गोल डोके, गाजर असलेले नाक आणि पोकळ डोळे बनवून स्नोमॅन बनवतो. खूप मजा येते. सर्व बर्फ गोळा केल्याने हात गोठतील म्हणून आम्ही थंडीसाठीचे कपडे घालतो. आम्ही मोठे गुडघ्यापर्यंतचे बूट, दोन किंवा तीन थरांचे कपडे, हातमोजे आणि थंड हवामानाला अनुकूल लोकरीची टो...

हॅलोविन

हॅलोविन हा सण माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. हा सण दरवर्षी ३१ ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया मिळतात आणि पोशाख घालता येतात. शेजारच्या मित्रांसोबत आम्ही ‘ट्रिक ऑर ट्रीट’ साठी फिरतो आणि जास्तीत जास्त टॉफी आणि चॉकलेट गोळा करण्याचा आनंद घेतो. हा एक अतिशय मजेदार सण आहे , आणि मला दरवर्षी या उत्सवाची खूप उत्सुकता असते. प्रत्येक वर्षी, आम्ही मोठे भोपळे (पंपकिन्स) आणतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य मिळून त्यावर कलाकुसर करतात. भोपळ्यांना आम्ही डोळे, नाक आणि तोंड कोरून एक चेहरा तयार करतो. भोपळ्यावर कोरलेले चेहरे पाहणे खूप रोमांचक वाटते, आणि जेव्हा त्यामध्ये प्रकाश टाकतो , तेव्हा त्याचा उजळलेला चेहरा पाहून खूप आनंद होतो. भोपळ्यांसोबत आम्ही हॅलोविनच्या विविध मूर्ती आणि सजावट ठेवतो, त्यामुळे संपूर्ण घर आणि अंगण हॅलोविनच्या वातावरणाने भारलेले असते. दरवर्षी, मी हॅलोविनसाठी एक नवा पोशाख विकत घेतो. यावर्षी मी बॅटमॅनचा पोशाख घ्यायचे ठरवले आहे. हॅलोविनसाठी खास दुकानं उघडली जातात , जिथे नवीन कपडे आणि सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. भीतीदायक मुख...

एस्केप खोली (Escape Room)

एस्केप रूम नावाची एक जागा आहे! हे एक खेळाचे ठिकाण आहे, जिथे आपल्याला एका खोलीत बंद केले जाते आणि तिथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोडी सोडवावी लागतात किंवा वेळ संपण्याची वाट पाहावी लागते. तिथे वेगवेगळ्या खोल्यांचा एक क्रम असतो, जिथे प्रत्येक खोलीतून बाहेर पडण्यासाठी नवीन कोडे दिले जाते. आपल्याला प्रत्येक खोलीत मिळणाऱ्या सूचना (clues) वापरून पुढच्या खोलीत प्रवेश करायचा असतो आणि शेवटी संपूर्ण भूलभुलैया पार करून बाहेर पडायचे असते. हे कोणतेही डिजिटल किंवा व्हिडिओ गेम नाही, तर सर्व खोल्या प्रत्यक्षात बांधलेल्या आणि खऱ्या आहेत. मी जेव्हापासून या एस्केप रूमबद्दल ऐकले होते, तेव्हापासून मला ते पाहायचे होते. माझ्या वडिलांनी सांगितले की हिवाळा किंवा पावसाळी दिवस या ठिकाणी भेट देण्यासाठी योग्य वेळ असेल. मला या रहस्यमय खोलीत जाण्याची खूप उत्सुकता होती. आमच्या मित्रांनी आणि कुटुंबाने एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. टीव्हीसमोर बसण्यापेक्षा मला मित्रांसोबत बाहेर जाणे अधिक आवडते. प्रवासादरम्यान गप्पा मारणे नेहमीच मजेदार असते. ललितने या एस्केप रूमबद्दल थोडा शोध घेतला होता. आम्ही तिथे गेल्यावर, ते एक कथा (...

डब्बा पार्टी - Potluck

पॉटलक (डब्बा पार्टी)  म्हणजे मित्र आणि कुटुंबीय एकत्र येऊन स्वादिष्ट अन्नाचा आनंद घेणे. आम्ही सहसा आठवड्याच्या शेवटी एकमेकांच्या घरी भेटतो. एकत्र जेवतो, खेळ खेळतो आणि अनेकदा चित्रपट पाहतो. मुले एक गट म्हणून खेळतात आणि मोठी माणसे वेगळ्या गटात. सर्वांसोबत वेळ घालवणे आणि खेळणे खूप मजेदार असते. पॉटलकच्या रात्री आम्ही बहुतेक वेळा त्यांच्याच घरी थांबतो आणि दुसऱ्या दिवशी घरी परततो. कधी कधी लोक वेगवेगळे नवीन पदार्थ बनवतात. प्रत्येक जण एक पदार्थ आणतो. कोणी सांबर, कोणी भाज्या, स्नॅक्स, भाताचे प्रकार किंवा चाट तर कोणी रसम आणतो. काही वेळा काही लोक हॉटेलमधूनही अन्न आणतात. पॉटलक सहसा हिवाळ्यात होतो, जेव्हा बाहेर जाणे कठीण असते. विविध पदार्थ पाहणे आणि त्यांचा आस्वाद घेणे मनाला मोहून टाकते. एकत्र जमून, गोल करून बसून गप्पा मारत जेवण्याचा आनंद काही औरच असतो. डोसा, वडे, पोळ्या, पाव भाजी  असे चविष्ट पदार्थ ताटात वाढले जातात. आम्ही सगळे मिळून हसत-खेळत गप्पा मारतो आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतो. काही जणांना जेवण्यापेक्षा खेळण्यात अधिक रस असतो, तर काही जण फक्त पदार्थांची चव चाखण्यात गुंग हो...

माझा वाढदिवस

माझ्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधीच मी माझ्या आई-वडिलांसोबत वाढदिवसाच्या तयारीबाबत चर्चा सुरू करतो. माझा वाढदिवस हिवाळ्यात येतो, त्यामुळे तो आतल्या जागेतच (ईनडोर) साजरा करावा लागतो. पण माझ्या भावाचा वाढदिवस उन्हाळ्यात येतो, त्यामुळे तो उघड्या मैदानात किंवा बागेत साजरा केला जातो. आम्ही आमच्या मित्रांना आमंत्रित करतो, आणि ते आम्हाला सुंदर भेटवस्तू देतात. त्याबदल्यात, आम्ही त्यांना एक स्मृतिचिन्ह (रिटर्न गिफ्ट) देतो. आम्ही दरवर्षी एक नवीन ठिकाण निवडतो, जसे की बाउन्सिंग हाऊस, गोकार्ट रेसिंग, किंवा अगदी इनडोअर फुटबॉल ग्राउंड. एकदा आम्ही वाढदिवसाला फुटबॉल कोर्ट बुक केला होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तासन्‌तास फुटबॉल खेळलो. त्यावेळी आमचा उत्साह पाहण्यासारखा होता! माझ्या भावाच्या वाढदिवसाला मात्र कोणतेही निर्बंध नसतात. तो बाहेर बागेत साजरा केला जातो, त्यामुळे वेळेची कसलीही मर्यादा नसते. तिथे आम्ही भरपूर खेळतो, गोड-धोड खातो, आणि भरपूर मजा करतो. घराच्या आतल्या जागांना वेळेची मर्यादा असते, पण बाहेरच्या जागांसाठी असा कोणताही अडथळा नसतो. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला धमाल येते. आम्ही दरवर्षी नवीन डिझ...

समामीश नदी काठ ची पायवाट (समामिश लेक ट्रेल)

समामिश सरोवराभोवती 10 मैलांची पायवाट आहे. विमलने आज तलावाभोवती सायकल चालवायची असे ठरवले. मेरीमूर पार्क उत्तरेस आहे आणि आंतरराज्य 5 (I-5) तलावाच्या दक्षिणेस आहे. या लांब अंडाकृती तलावाभोवती सायकलिंग करता येते. विमलने तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या आपल्या घरापासून सायकल सफर सुरू केली. सम्मामिश तलावाचा पश्चिम भाग स्वतंत्र आणि सुंदर घरांनी भरलेला आहे. ही घरे रस्त्याच्या उतारावर वसलेली आहेत. जर तुम्ही तलावाच्या काठाजवळून रस्त्यांकडे पाहिलं, तर तुम्हाला फक्त घरांची छप्परं दिसतील! रस्ते उंचीवर असल्यामुळे तिथून दृश्य स्पष्ट दिसतं, तर घरे जणू खोल दरीत दडलेली असल्यासारखी वाटतात तलावाच्या चारही बाजूंनी एक सायकल ट्रॅक आहे आणि विमल त्या मार्गावर सायकल चालवत होता. रस्त्यावर चढाव असल्याने सायकल चालवताना तो जोरात श्वास घेत होता. लवकरच तो वासा पार्क जवळ पोहोचला. वासा पार्क हे एक खासगी उद्यान आहे, आणि तिथे सायकल चालवण्यासाठी फक्त एका बाजूला ट्रॅक आहे, त्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांसमोर सायकल चालवणे कठीण होते. तिथे काही नैसर्गिक सौंदर्य नव्हते, त्यामुळे विमलला तो परिसर कंटाळवाणा वाटत होता. तो वार...

शेतकरी बाजार

आमच्या घराजवळ दर वर्षी उन्हाळ्यात शेतकरी बाजार भरतो वर्षातून किमान एकदा, आम्ही शेतकरी बाजारात जातो.  तिथे शेतकरी त्यांच्या ताज्या कापलेल्या कृषी उत्पादनांमध्ये भाज्या, फळे आणि औषधी वनस्पती विकतात. अनेक कलाकुसरीचे स्टॉल, खाद्य स्टॉल, संगीत वाद्य, स्वेटर आणि शॉलसारखे लोकरीचे उत्पादन आणि हस्तकला येथे बघायला मिळतात. असं वाटतं की आपण एखाद्या गावात फिरत आहोत. या बाजारात फिरणे आकर्षक आहे. शेतकरी आणि कारीगर त्यांच्या वाहनांच्या भागाला दुकानासारखे बनवतात. आणि दिवसाच्या शेवटी, ते त्यांचे सामान गोळा करतात. ते आपल्या वाहनांमध्ये लोड करतात आणि जागा सोडतात. या किसान बाजारात मोठ्या संख्येने तात्पुरते भाडेकरू असतात. आम्ही सामान्यतः नियमित दुकानदारांकडून खरेदी करतो, पण शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करणे एक आनंददायी अनुभव आहे. ज्या भाज्या आणि फळे आम्ही मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समधून खरेदी करतो, ते काही दिवसांनी डब्यात कैद होऊन आमच्यापर्यंत पोहोचतात. पण या बाजारात उत्पादनाची कापणी आमच्या खरेदी करण्यापूर्वी काही दिवस आधीच होते, ज्यामुळे ती अगदी ताजी राहतात. आम्ही फळे आणि भाज्यांच्या टोकऱ्या खरेदी करतो. मा...