पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बागकाम

घरची झाडे सुंदर दिसतात. नवीन पालवी, नवीन कळ्या, नवीन फुले सर्व सुंदर असतात. वाळलेले पान देखील सुंदर दिसतात. जर कुंडीतील रोपे सुंदर दिसतात पण बागेतील रोपे त्याहुउनही सुंदर दिसतात. वेगवेगळ्या वनस्पतींसोबत राहिल्याने आनंद मिळतो. आमच्या घरात गुलाबाची विविध रोपे आहेत. झेंडूचे झाड आणि सफरचंदाचे झाड ही आहे. हिरवेगार लॉन देखील आहे. लॉन हिरवेगार ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी द्यावे लागते.  दरवर्षी उन्हाळा सुरू होताच आम्ही पुन्हा रोपांची काळजी घेण्यास सुरुवात करतो. आम्ही रोपांसोबत काहीतरी करतो जसे की त्यांची माती बदलणे, कंपोस्ट घालणे आणि त्यांना सूर्यप्रकाशित ठिकाणी ठेवणे. दरवर्षी आम्ही एक नवीन रोप खरेदी करतो. नवीन रोपासाठी योग्य जागा शोधून आणि त्यासाठी एक खड्डा खणून आणि संपूर्ण मुळे जमिनीत गाडतो. नवीन माती टाकून पाणी देतो. पुढील काही दिवस त्याचे निरीक्षण करून रोप वाढेल याची खात्री करतो. चला बागेत नवीन माती टाकूया आणि एक नवीन ढिगारा बनवूया. आपण त्यात टोमॅटो आणि बीन्स सारख्या भाज्या लावू. आपण माती, खत आणि पाणी देऊ. हि रोपे एका महिन्यात वाढतात...

आगगाडीचा प्रवास (ट्रेन चा प्रवास)

ट्रेन (आगगाडी) चा प्रवास नेहमीच खूप मनोरंजक असतो. प्रवास करताना आपण खिडक्यांमधून सर्व काही पाहू शकतो. आपण चालत्या ट्रेनमध्ये फिरू शकतो, चांगले अन्न आणि स्नॅक्स खाऊ शकतो, खेळ खेळू शकतो आणि संभाषण हि करू शकतो. एकूणच, तो एक आनंददायी अनुभव असतो. मी सिएटल ते पोर्टलँड असा प्रवास केला आहे. आम्ही वेळेवर स्टेशनवर पोहोचलो, रांगेत उभे राहिलो आणि आमची तिकिटे तपासून घेतली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आमचा कोच आणि जागा ठरऊन दिल्या, आणि आमचे सामान नीट ठेवले. तिकीट कंडक्टरचा गणवेश सुन्दर होता. सर्व औपचारिकता पूर्ण करून आम्ही आगगाडीत चढलो. रेल्वे स्थानकात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो. रेल्वे चे समांतर ट्रॅक कधी जुळून येतात तर कधी वेगळे होतात, हे पाहून आश्चर्य वाटते. हे दृश्य पाहायला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात काही भिंतींवरचे भिंतीचित्र दिसले, असे दृश्य माझ्यासाठी नवीन होते. गाडी गावातून जात असताना तेथील मुले गाडीकडे वळून टाटा करायची. मी हि त्यांना टाटा केला पण त्यांनी मला पाहिले कि नाही याची मला खात्री नाही.  आमच्या ट्रेनमध्ये एक निरीक्षण कक्ष होता जिथून आम्ही निसर्गरम्य सौंदर्य बघू शकत होतो. ...

ईडलवूड बीच पार्क

ईडलवूड बीच पार्क हे समामिश सरोवराच्या काठावर वसलेले एक गोंडस छोटे उद्यान आहे. यात मुलांसाठी खेळण्याची जागा, मुलांसाठी नियुक्त पोहण्याची जागा, वाळूची किनारपट्टी आणि मनोरंजनासाठी इतर अनेक ठिकाणे आहेत. या उद्यानात अनेक बदके आहेत, जी अनेकदा कळपात सुंदरपणे चालतात आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांना तलावात शांतपणे पोहताना पाहणे हे एक सुंदर दृश्य आहे.  तलावावर एक तरंगणारा प्लॅटफॉर्म देखील आहे ज्यावर उभे राहून पर्यटक पाण्याच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. प्लॅटफॉर्मचे सौम्यपणे डोलणे एक आनंददायी अनुभव निर्माण करतो. वाळूच्या किनारपट्टीवर चालणे हा देखील एक उत्तम अनुभव आहे आणि मुले किनाऱ्यावरील खेळण्यांसह खेळू शकतात, वाळूचे किल्ले बांधू शकतात आणि खड्डे खणू शकतात. या पार्क मध्ये मुलांना खेळण्यासाठी झुले, स्लाईड आणि मंकी बार आहेत, तर उद्यानात हँडबॉल कोर्ट आणि चालण्यासाठी एक ट्रेल देखील आहे. याव्यतिरिक्त, कम्युनिटी सेंटर हॉल वाढदिवस साजरा करण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. या उद्यानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तलावात वाहणारा पाण्याचा झरा. पाण्याच्या झऱ्यावर अनेक छोटे पूल बांधलेले आहेत, आण...

सम्मामिष तलावाची पायवाट (ट्रेल)

सम्मामिष लेक हे एक सरोवर आहे ज्यात सुमारे १० मैलांचा रस्ता आहे. विमलने आज तलावाभोवती सायकल चालवायचं ठरवलं. या तलावाच्या उत्तरेला मेरीमूर पार्क तर दक्षिणेला इंटरस्टेट ५ आहे. या लांब अंडाकृती तलावाभोवती सायकलवरून फिरता येते. विमलने तलावाच्या पश्चिमेकडील त्याच्या घरापासून सायकल चालवायला सुरुवात केली. तलावाच्या पश्चिमेकडील बाजूला स्वतंत्र घरे आहेत. ही घरे रस्त्याच्या उतारावर आहेत. जर तुम्ही तलावाच्या बाजूच्या रस्त्यांवरून ती पाहिली तर तुम्हाला केवळ घरांची छप्परेच दिसतील. रस्ते अधिक उंचावर असतील आणि घरे खोर्‍यात असतील. तलावाभोवती एक सायकल मार्ग आहे, आणि विमल त्या रस्त्यावर सायकल चालवत होता. रस्ता वर चढावलेला होता, आणि विमलला सायकल चालवताना दम लागत होता. लवकरच वासा पार्क आले. वासा पार्क ही खाजगी मालमत्ता आहे, आणि सायकल मार्ग केवळ रस्त्याच्या एका बाजूला असल्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना सामोरे जाणे कठीण होते. निसर्गसौंदर्य नसल्याने ते विमलसाठी कंटाळवाणे नव्हते. त्याने अनेकदा त्याचा वेग आणि त्याने कापलेले अंतर तपासले.  त्या रस्त्यावर एक ल...

आगगाडी चा प्रवास

 आगगाडी चा प्रवास

फ्रॅंकलिन धबदबा (फॉल्स)

उन्हाळ्यात पर्वतांवर चढाई करणे खूप सामान्य आहे, परंतु हिवाळ्यात बर्फाळ ढगांच्या शिखरांवर चढाई करणे साहसी आणि कठीण आहे. हा एक ताजा आणि नवीन अनुभव आहे. एका हिवाळ्यात, कार्ती, गुरु, गणेशन आणि सेंधिल ट्रेकिंगला निघाले.   पहाटे ५ वाजता ते तयार झाले आणि इस्साक्वा बस स्थानका पासुन एका रोमांचकारी प्रवासाची सुरुवात केली. एकमेकांच्या परिचयानंतर त्यांनी तिरुमंधिरम या सर्वात जुन्या तमिळ पुस्तकावर चर्चा केली। या पुस्तकात शारीरिक आणि मानसिक आरोग्य, योगिक पद्धती, श्वासोच्छवासाचे व्यायाम अशा बर्याच विषयांवर भाष्य आहे. गणेशनला सिलंबम (काठयांनी लढण्याची लोककला) आणि टिन कारखान्यात काम करणाऱ्या त्याच्या सिलंबम शिक्षकाची आठवण आली. त्यांच्या कामाच्या वेळेनंतर, रात्री ९ च्या सुमारास, ते वचनबद्धतेने, जुने टायर जाळून गणेशनला सिलंबमची कला शिकवत असे. त्या काळात, शिक्षक बुद्धिमान आणि त्यांच्या कामात पूर्ण समर्पित होते. असे शिक्षक तरुणांसाठी आदर्श होते. आजकाल असे उत्साही शिक्षक दुर्मिळ आहेत. विद्यार्थी आणखी दुर्मिळ आहेत. कार्तीने निराशा व्यक्त केली की, जरी चांगले कलारी शिक्षक असले तरी, त्यांना नौकरी देणार...

आरंभ करा!

दुपारी 12 वाजता सम्मामिष तलावाभोवती सायकलिंग मोहिमेवर जाण्याचा निर्णय व्हॉट्सॲप मेसेजद्वारे घेण्यात आला। त्यांनी चंद्रमोहनला गटात येण्याचे आमंत्रण दिले, पण मुलाला क्लास ला घेऊन जायचे आसल्यामुळे त्यांनी येण्याचे टाळले. हवा भरायचे ठरवून मी पंप बाहेर काढला, पण पंपाचे नोझल तुटल्यामुळे हवा चाकात जात नव्हती. मी माझ्या कारमध्ये सायकल घेतली आणि सायकल दुरुस्तीच्या दुकानात गेलो. मी पोहोचलो तेव्हा दुकानात माझ्या समोर दोन लोक होते. एक माणूस त्याच्या मुलाच्या सायकलचे स्पेअर पार्ट्स विकत घेत होता, तर दुसरा त्याच्या नवीन सायकलसाठी एअर पंप, सेल फोन स्टँड, पंक्चर किट आणि बरेच काही खरेदी करत होता. शेवटी त्याने त्याचे पेमेंट पूर्ण केले आणि पुढे गेला. दुकानदाराने नम्रपणे वाट पाहण्याबद्दल माझे आभार मांडले आणि मला काय मदद हवी आहे असे विचारले. तो एक सुंदर क्षण होता. त्याचे विस्कळीत केस आणि व्यावसायिक अभिमान त्याला खरोखरच आवडते बनवतात. मी सायकल मध्ये हवा भरली आणि नवीन पंप पण घेतला. ही सायकल मला पोर्टलँडला घेऊन जाऊ शकते का, असे मी त्याला सहज विचारले आणि त्याने हसून उत्तर दिले की माझ्यापेक्षा वाईट सायकल असल...

समामीश नदी काठ ची पायवाट

 समामीश नदी काठ ची पायवाट

मेरीमूर पार्क

मी पाच वर्षांचा असताना मेरीमूर पार्कला गेलो आणि घसरगुंडीवर खेळलो. मी चक्रावर बसण्याच्या खेळणीवर (सिट आणि स्पिन) गोल गोल फिरण्याचा आनंद घेतला आणि झोका खेळण्यात खूप वेळ घालवला. माझे वडील तेथील उपकरनांवर व्यायाम करत होते आणि तेथे हायस्कूलचे विद्यार्थी फुटबॉल/सॉकर खेळत होते. मला वाटते की ही शाळांमधील स्पर्धा होती. तेथे अनेक टेनिस कोर्ट देखील होते आणि मी माझ्या पहिल्या भेटीतच उद्यानाच्या प्रेमात पडलो. आज, मी माझ्या वडिलांसोबत आमच्या सायकलवरून उद्यानाला पुन्हा भेट दिली. वडिलांनी मला संपूर्ण परिसर फिरवण्याचे वचन दिले, आणि आम्ही लोखंडी पुलावरून (आयर्न ब्रिज वरून) आलो. हा आमचा नेहमीचा मार्ग नाही. आम्ही पुलावर थांबलो आणि पक्षी पाहत नदीच्या सौंदर्याचा आनंद घेतला. पूल ओलांडताना आम्हाला अनेक बेसबॉल कोर्ट आणि खेळाचे मैदान दिसले, पण मी आज खेळलो नाही. माझ्या लक्षात आले की सर्व सहा फुटबॉल कोर्टवर इलेक्ट्रिक बल्ब बसवले आहेत. मला आठवले की आईने आम्हाला आमच्या बागेची तपासणी करण्यास सांगितले होते. तिने आमच्यासाठी एक छोटी जमीन भाड्याने घेतली होती, तिथे आमचे टोमॅटो चांगले वाढले होते. जे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स...

उच्च माध्यमिक शाळा - जागतिक भाषा क्रेडिट्स

उच्च माध्यमिक शाळा पूर्ण करण्यासाठी जितक्या क्रेडिटची आवश्यकता असते ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला आणि विज्ञान विषयांव्यतिरिक्त जागतिक भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. काही शाळा जर्मन किंवा फ्रेंच भाषांचा पर्याय देतात किंवा विद्यार्थी त्यांची मातृभाषा ही निवडू शकतात. फेडरल सरकारने तामिळचा जागतिक भाषांपैकी एक म्हणून समावेश केला आहे आणि मुले तमिळ शिकू शकतात आणि त्यांच्या पालकांच्या किंवा स्थानिक तमिळ शाळांच्या मदतीने पात्रता परीक्षेला बसू शकतात. अमेरिकन कौन्सिल ऑफ फॉरेन लँग्वेजेस जागतिक भाषांमध्ये प्राविण्य परीक्षा घेते. या विषयावर अधिक माहितीसाठी पालक आणि विद्यार्थी शाळेतील शैक्षणिक समुपदेशकांशी चर्चा करू शकतात. ही पात्रता परीक्षा चार मापदंडांवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करते: निरीक्षण: मला काही शब्द माहित आहेत. हळू बोलले तर काही प्रमाणात समजते. जे बोलले जाते त्याचे सार मला सामान्यतः समजते. मी रेडिओ आणि टीव्ही शो समजू शकतो. मी संभाषणे, सिनेमाचे संवाद इत्यादी पूर्णपणे समजू शकतो. वाचन: मला काही शब्द माहित आहेत. मला सामान्यतः काही वाक्ये समजतात. मी लह...

माऊंट रेनिअर वरचा सूर्योदय

सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही पहाटे तीनच्या सुमारास डोंगर चढायला सुरवात केली। या ट्रिप साठी फक्त तीन तासांची झोप मिळेल, अंधारी वाट, आणि सिएटलच्या थंड वातावरणात उंच डोंगर चढावा लागेल असे कळले तेव्हा मी खूप घाबरलो. पण मित्रांबरोबर ट्रेक करण्याची आणि अविस्मरणीय सूर्योदय पाहण्याची संधी मला गमवायची नव्हती म्हणून मी राजी झालो. काही मित्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन येणार होते, तर काही जण फक्त त्यांच्या मुलांना आणणार होते. घरापासून पायथ्यापर्यंतचा प्रवास सुमारे अडीच तासांचा होता. मध्यरात्री घरापासून सुरुवात करून पहाटे ३ वाजता आम्ही सर्व पायथ्याशी पोहोचलो. या प्रवासात आमची रात्रीची झोपच उडाली. ठरल्याप्रमाणे आम्ही मध्यरात्री दोन गाड्यांनी प्रवास सुरू केला आणि २४ तास चालणारे कॉफी शॉप शोधू लागलो. रात्रभर जागे राहण्यासाठी आम्ही गप्पा-गोष्टी करत होतो. असा रात्रभर प्रवास करणे माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता.  पाठीमागच्या गाडयांच्ये दूरचे मंद दिवे डोळ्यांना झपकी देत होते, तर समोरचा लांब आणि वळणदार रिकामा रस्ता आम्हाला तंद्रीतून जागा ठेवत होता. अधून मधू...

स्कूल बस - school bus

शाळेच्या बसमधून प्रवास करण्यात मला नेहमीच आकर्षण असतं. माझ्या शाळेच्या बस पिवळ्या आणि केशरी रंगाच्या आहेत. या बसेस वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. प्रत्येक मार्गाचे नाव रंगावरून दिले आहे. हे रंग-कोड मार्ग दर्शवतात. माझा मार्ग लाल मार्ग आहे. प्रत्येक मार्गावर अनेक स्टॉप आहेत. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळेत पोहोचवण्यासाठी बस प्रत्येक स्टॉपवर थांबते.  माझे बाबा किंवा आई मला बस स्टॉपवर घेऊन यायचे. आम्ही सर्व विद्यार्थी रांगेत थांबायचो. शाळेची बस वक्तशीर असायची आणि ठरल्या वेळी यायची. बस आल्यावर आम्ही सर्वजण एक एक करून शांतपणे बस मध्ये बसायचो. जर माझी सीट खिडकीजवळ असेल तर मी आई-बाबांना टाटा करायचो. उन्हाळ्यात आजी-आजोबा बस स्टॉपवर दिसायचे. मोठा झाल्यावर मी आई-बाबां शिवाय बस स्टॉपवर एकटाच जायला लागलो. मला माझ्या मित्राच्या शेजारी बसायला आवडायचे, म्हणून त्याच्या शेजारीची सीट मोकळी असल्यास मी नेहमी त्याच्या शेजारी बसायचो.  सुरक्षेची वैशिष्ट्ये पाहता, बसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्याच्या अनेक बाबी असतात. सर्व विद्यार्थी बस...